पिंपरी-चिंचवडमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार   

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराला  मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले.पावसामुळे सर्व रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली.सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटातसह जोरदार पाऊस झाल्याने वाहतूक चांगलीच विस्कळीत झाली होती. पुणे मुंबई महामार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र चिखल झाला होता. ग्रेड सेपरेटर प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांची वाहन चालवताना कसरत होत होती.बी आर टी बसस्थानकां समोरही गुडघाभर पाणी साचल्याने  बसमधून उतरल्यानंतर रस्त्याच्या पलीकडे जाताना प्रवाशांची चांगलीच कुचंबना होत होती.

Related Articles